तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील हुतात्मा स्मारक ते आर्य चौक ते किसान चौक या रस्त्याचे बारा मिटर रस्ता रुंदी करणाचे काम पंधरा ते वीस वर्षा पासुन रखडले असुन या रस्ता कामा बाबतीत तारीख पे तारीख मिळत आहे. सदरील रस्ता हा भवानी रोड ते शुक्रवार पेठ, पाणी टाकी याला समांतर रस्ता असल्याने तो प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावा. यासाठी माजी नगरसेवक सुनील संभाजीराव रोचकरी यांनी बुधवार दि. 21 मे रोजी मंत्रालयात जावुन नगरविकास सचिव प्रधान सचिव गुप्ता यांची भेट घेतली व निवेदन सादर केले.
प्रधान सचिवाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, तुळजापूर विकास प्राधिकरणा अंतर्गत हुतात्मा स्मारक - भवानी चौक -आर्य चौक - किसान चौक या रस्त्याचे काम मागील 20 ते 25 वर्षापासुन कुठल्या न कुठल्या कारणास्तव रखडले आहे. प्रशासनास माहीती मागितली तर प्रशासन हे मंत्रालयात प्रस्ताव आहे तेथून मंजुरी मिळाली की काम चालु होईल असे सांगतात. प्राधिकरणाच्या कामामुळे तेथील रस्ता, नाली संपूर्ण खराब झाली आहे. नवीन काम करता येत नाही. तेथील रहिवाशांना स्वताःचे बांधकामही करता येत नाही. रस्ता खराब असल्याने गटारीही खराब झालेल्या आहेत. हा गावातील प्रमुख रस्ता असल्यामुळे त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे सामान्य नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेथे पुजारी रहीवासी असल्याने भाविक त्यांच्या घरी येत असतात. त्यांनी जर चार चाकी वाहन रस्त्यावर लावले तर मोटारसायकल जाण्यासही रस्ता राहत नाही. हा रस्ता मंदिरापासुन फक्त 50 मिटर अंतरावर येतो. या रस्त्याचे रूंदीकरण लवकरात लवकर झाले तर येणाऱ्या भाविकांची व रहिवाशांची सोय होईल.असे निवेदनात म्हटले आहे.