तुळजापूर (प्रतिनिधी) - धाराशिव जिल्हयातील भाजपचा ताब्यात असलेला एकमेव्य तुळजापूर विधानसभा मतदार संघ सध्या जिल्हयातील राजकारणाचा केंद्र बिंदू बनुन तो राजकिय रणांगण आखाडा बनला आहे. धाराशिव जिल्हयात चार विधानसभा मतदार संघ आहेत. त्यात शिवसेना (उबाठा) कडे धाराशिव -कळंब व उमरगा, लोहारा तर भाजपकडे तुळजापूर, शिवसेना (शिंदेगट) भूम -परांडा मतदार संघ आहे. तर येथील लोकसभा मतदार संघ शिवसेना (उबाठा) पक्षाकडे आहे.सध्या जिल्हयात प्रामुख्याने शिवसेना(उबाटा) व भाजप या दोन पक्षात प्रचंड ताणतणावाचे वातावरण आहे. दोन्ही ही पक्ष एकही संधी सोडण्यास तयार नसल्याने जिल्हयात नव्हे तर राज्यात हा मतदार संघ राजकीय रणांगणचे कुरुक्षेञ बनले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदार संघ राज्यात सर्वाधिक चर्चत मतदार संघ मागील पाच वर्षा पासुन बनल आहे. पुर्वी हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माञ 2019 नंतर तो भाजपकडे आमदार राणाजगजितसिंह पाटील रुपाने गेला आहे. त्यामुळे या मतदार संघावर जिल्हयातील सर्वच पक्षनेते यांचे बारीक लक्ष आहे. नुकतेच तिर्थक्षेञ तुळजापूर येथे सापडलेल्या ड्रग्जचा विरोधकांनी सत्ताधारीवर मात करण्यासाठी पुरेपुर वापर केला. ड्रग्ज पेक्षा अधिक टारगेट आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना केले गेले. तिर्थक्षेञ तुळजापूरला ड्रग्ज ग्रॅम मध्ये सापडले. पण बोलबोला राज्यात किलोभर सापडल्याचा झाल. तर शेजारील लातुर, सोलापूर जिल्हयात ड्रग्ज किलोभर सापडले पण त्याची तुळजापूर इतकी चर्चा कुठेही झाली नाही. धाराशिव जिल्हयात माञ विरोधकांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना श्रीक्षेञ तुळजापुरविकास आराखडा ड्रग्ज सह अनेक प्रश्नावरुन लक्ष करुन टिकेचे झोड उठवले. यात त्यांच्या पक्षातील पदाधिकारी यांनी चुप्पी साधल्याने विरोधी पक्षाने याचा पुरेपुर फायदा उठवुन भाजप सह मुखमंञी गृहमंञी असलेले देवेंद्र फडणवीस यांचावर ही शिरसंधान साधण्याचा प्रयत्न झाला. यात मिञ पक्षांचा काही पदाधिकारींची साथ विरोधकांना झाली. यामुळे भाजपने या तालुक्यात हजारो कोटी रुपयांचे सुरु केलेल्या विकास कामापेक्षा भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या करण्यात आलेले आरोप वरचढ ठरले. श्रीतुळजाभवानी मंदीर श्रीक्षेञ तुळजापुर विकास आराखडा कृष्णा खोऱ्यातील पाणी, रेल्वे, ड्रग्ज, औधोगिक वसाहत सह मनोज जरांगे पाटलांचे मराठा आंदोलन सह अनेक गोष्टींवर भाजपला टारगेट केले गेले. जिल्हयात तुळजापूर विधानसभा मतदार संघ वगळता इतर मतदार संघाची चर्चा नसते. माञ प्रत्येक महिन्याला तुळजापूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक प्रश्नावर राजकिय जुगलबंदी ठरलेली असते.
शिवसेनेचे लक्ष तुळजापूर विधानसभा मतदार संघावर !
शिवसेना खा ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर विरोधक भाजप आ राणाजगजितसिंह पाटील हे असल्याने आमदार पाटलांना त्यांचाच मतदार संघात शह देवुन गुंतवुन ठेवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्युहुरचना आखली असुन, शिवसेना तुळजापूर तालुक्यात मोठा राजकिय भुकंप करण्याचा तयारीत आहे. त्यानंतर तर मग तुळजापूर विधानसभा मतदार संघ राजकिय संघर्षाचे रणांगण आखाडा बनणार आहे.