भूम (प्रतिनिधी)- भूम शहर व तालुक्यातील व्यापारी बांधवांचा इचलकरंजी व अकलूज येथील मोठ्या बाजारपेठेशी असलेला व्यवहार विचारात घेता या मार्गावर तात्काळ बस सेवा सुरू करावी अशी मागणी व्यापारी वर्गाणी लेखी निवेदनाद्वारे भूम आगार प्रमुख व विभागीय नियंत्रक धाराशिव यांच्याकडे केली आहे .

बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी भूम आगार व विभाग नियंत्रक धाराशिव यांच्याकडे भूम शहर व तालुक्यातील व्यापारी बांधवांनी नवीन बसेस सुरू करण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे. यादरम्यान इचलकरंजी, अकलूज, नांदुरघाट या भागात मोठया बाजार पेठेतल्या व्यवहाराशी संबंध असल्यामुळे व्यापारी बांधव नागरिकांना सातत्याने येणे जाणे करावे लागते. थेट बस सेवा नसल्याने अनेक ठिकाणी बसेस बदलाव्या लागतात, यामुळे वेळ, पैसा, श्रम वाया जाते.  शिवाय गैरसोय होते, यामुळे भूम आगाराच्या बसेस इचलकरंजी, अकलूज या मार्गावर सुरू करावी अशी मागणी केली आहे. निवेदनावर कोष्टी समाज ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल बागडे, सचिव शंकर खामकर, सदस्य योगेश आसलकर , उपाध्यक्ष शाम वारे,  श्याम बागडे, युवराज वरवडे, शंकर मेहेत्रे, प्रकाश बागडे, अंबादास वरवडे, संतोष गुरसाळी, बाळू बाबर, प्रथम वरवडे , नवनाथ रोकडे , मनोज बोत्रे, योगेश दिवटे, सुनील दिवटे आदींच्या सह्या आहेत.


 
Top