तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बालाजी अमाईन्सच्यावतीने गतवर्षी तुळजापूर रोडच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरीतील गाळ काढून खोलीकरणाचे काम करून उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यास मदत केली होती. यंदाच्या वर्षी सुरतगाव ते सावरगाव (गंजेवाडी रोड) वर पाझर तलवात असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहीरीचे गाळ काढून तसेच खोलीकरण करून आरसीसी बांधकाम करून मिळावे अशी मागणी सुरतगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचेकडे करण्यात आली. गतवर्षी खोलीकरण व गाळ उपसा झाल्यामुळे गावाचा पाण्याचा प्रश्न कमी झाला. पाझर तलावातील विहीरीचे खोलीकरण केल्याने पाण्याची पातळी वाढून सुरतगावास पाण्याची टंचाई कधीच होणार नाही. यामुळे तलावावील विहीरीचे खोलीकरणाचे व गाळ उपसा करण्याच्या कामास बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व संचालक मंडळाने मंजुरी दिली.
खोलीकरण कामाचा शुभारंभ बालाजी अमाईन्सच्या एचआर. विभागाचे असिस्टंट मॅनेजर मारुती सावंत यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. बालाजी अमाईन्सच्यावतीने विहीरीतील गाळ उपसा करणे, विहीरीचे खोलीकरण करणे, पाणी उपसा करण्याकरीता विद्युत मोटार बसवणे, विहीरी पर्यंत जाण्याकरीता रस्ता तयार करणे, विहीरीचे आरसीसी बांधकाम करणे इत्यादी कामे करण्यात येणार असल्याचे दत्तप्रसाद सांजेकर यांनी सांगितले.
यावेळी बाबासाहेब गुंड यानी बालाजी अमाईन्सच्या सी एस आर अंर्तगत सुरतगावात गेल्यावर्षी विहीरीतील गाळ व खोलीकरणाचे काम व सुरतगावस स्मशानभुमी चे बांधकाम सुरतगाव जि. प. प्राथमिक शाळेस रंगरंगोटी या केलेल्या कामा करीता तसेच पाझर तलावातील विहीरीचे खोलीकरणाचे कामास केलेले मदत या बददल व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी सह व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर रेडडी तसेच संचालक मंडळ यांचे आभार मानले. तसेच सुरतगाव ग्रामपंचायतीच्यावतीने पाझर तलावातील विहीर ते सुरतगावापर्यंत पाईपलाईनचे काम करण्यात येणार असल्याचे उपसरपंच बाबासाहेब गुंड यांनी सांगितले.
या कार्यक्रमास सुरतगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाबासाहेब गुंड, सरपंच दोपदी गुंड, ग्रामसेवक भिमराव झाडे, ग्रामपंचायत सदस्य विजय देवकर ,आबासाहेब गुंड, गजेन्द्र बोचरे, विठठल गुंड सर, राजाभाऊ गुंड, सौदागर गुंड, नानासाहेब गुंड, बालजी अमाईन्सचे प्रसाद सांजेकर, बसवराज अंटद गावातील नागरीक आदि उपस्थित होते.