तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे मागील चार महिन्या पासुन वाहनतळ लिलाव प्रक्रिया नगर परीषदने केली नसल्याने वाहनतळ लिलाव प्रक्रिया दिरंगाई मागे कारण काय ! असा सवाल शहरवासियांन मधुन केला जात आहे. या वाहनतळ लिलाव प्रक्रिया दिरंगाईमुळे अवैध पार्किंग माध्यमातून नगरपरीषदचे प्रतिदिन लाखो रुपये नुकसान होत आहे. अशी चर्चा शहरात सर्वञ होत होत आहे.
तिर्थक्षेञी अद्याप रेल्वे आली नाही. सध्या उन्हाळी सुट्या, लग्नसराई पार्श्वभूमीवर लाखोचा संखेने भाविक खाजगी वाहनांनी येत असुन, वाहनांनी वाहनतळे, शहरातील रस्ते, महामार्ग रस्ते भरुन जात आहेत. सध्या शहरात रोज आठवड्यातील चार दिवस म्हणजे गर्दी दिन वीस हजार पेक्षा अधिक वाहने ये-जा करीत आहेत. सध्या वाहनतळ वसुली नगरपरीषद कडुन केली जात असल्याने मग वाहनतळ वसुली दाम कुणीकडे जात आहे. असा सवाल शहरवासियांमधुन केला जात आहे. विशेष म्हणजे नगरपरीषदला पुर्णवेळ मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे रुपाने मिळाला असताना नगरपरीषद वाहनतळ प्रक्रिया पार पाडली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होते. वाहनतळ लिलाव प्रक्रिया मागे झारीतील शुक्राचार्य कोन आहेत यांचाच बंदोबस्त जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालुन करण्याची मागणी शहरवासियांमधुन केली जात आहे. सध्या नगरपरीषद वाहनतळ वसुली बाबतीत शहरवासियांत साशंकता व्यक्त होत आहे. खाजगी वाहन तळवाल्यांकडून वाहनचालकांना मुलभुत सुविधा मिळत नाहीत.