तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 44 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
उन्हाळ्यामध्ये राज्यात रक्तपुरवठा अनियमित होतो यामुळे रक्तदान करणे किती महत्त्वाचे आहे यासाठी महाविद्यालयीन तरुणांना याचे महत्त्व पटवण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. ओमप्रकाश राजनकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर वेळी उपप्राचार्य आर. जी. मुदकन्ना तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विवेक गंगणे व एनएसएस प्रमुख प्रा. सचिन सगरे उपस्थित होते. सदर शिबिर यशस्वी व्हावे यासाठी महाविद्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी श्रम घेतले. सदर शिबिरामध्ये 44 रक्तदात्यांनी रक्तदान केले.