कळंब (प्रतिनिधी)- धाराशिव 2025 व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय खुला गट पुरुषांची निमंत्रित कबड्डी स्पर्धा दिनांक 10, 11 व 12 मे 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बार्शी रोड, कळंब येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 51 हजार रुपये कै. सुरेश हारकर यांच्या स्मरणार्थ फिरता चषक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांच्या 61 निमित्त अजित पिंगळे यांच्या सौजन्याने रोख दुसरे बक्षीस 31 हजार रुपये, कै. तुकाराम (दादा) कदम यांच्या प्रित्यर्थ चषक, डॉ. संदीप तांबारे व सुरेश आळणे यांच्या सौजन्याने 21 हजार रुपये व 10 हजार रुपये रोख बक्षीस, तिसरे बक्षीस कै. दिलीप जावळे यांच्या प्रित्यर्थ चषक, शशिकांत निरपळ यांच्या सौजन्याने 21000 रुपये रोख बक्षीस याचबरोबर उत्कृष्ट पकड 2501 हरिश्चंद्र चोंदे यांच्या स्मरणार्थ व उत्कृष्ट चढाई 2501 विलास थोरात यांच्या स्मरणार्थ, अष्टपैलू 5001 संपतराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ, दिवसाचा सामनावीर 2501 कै. बशीर (दौला) मणियार यांच्या स्मरणार्थ रोख बक्षीस. वरील सर्व वैयक्तिक बक्षीस पांडुरंग कुंभार यांच्या सौजन्याने असतील.
संघ नोंदणी संपर्क लक्ष्मण मोहिते ,साजिद चाऊस ,फुलचंद कदम ,सुबराव कांबळे,रवी उबाळे यांच्याशी करावा असे आवाहन युवक आघाडी संस्थापक अध्यक्ष यशवंत दशरथ व स्पर्धा संयोजन समिती सचिव डॉ.अभिजीत लोंढे यांनी केले आहे.