उमरगा (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक लागल्यानंतर लक्ष लागून असलेल्या उमरगा आणि लोहारा तालुक्यातील मतदारसंघाचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाचे स्पष्ट वर्चस्व दिसून आले नाही. भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनी आपापल्या बालेकिल्ल्यांमध्ये विजय मिळवला आहे. 

उमरगा आणि लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमधील विजय उमेदवार तुरोरी गट अर्चना युवराज जाधव अपक्ष, कुन्हाळी गट लताताई शिवाजीराव मोरे काँग्रेस, कदेर गट उषाताई रविंद्र गायकवाड शिवसेना शिंदे गट, दाळींब गट रफिक तांबोळी भाजप, येणेगुर गट रचना राठोड भाजप, कवठा गट महेश देशमुख काँग्रेस, बलसूर गट सविता सुरेश बिराजदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आलूर गट आप्पासाहेब पाटील अपक्ष, गुंजोटी गट शहाजी पाटील भाजप, माकणी गट अश्विनी जवळगे शिवसेना उबाठा गट, कानेगाव गट सुवर्णाताई पाटील शिवसेना शिंदे गट या प्रमाणे विजयी उमेदवारांची नावे आहेत.  

दाळींब, येणेगुर आणि गुंजोटी या महत्वाच्या गटांमध्ये भाजपने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. तर कुन्हाळी आणि कवठा या गटात काँग्रेसने विजय मिळवत आपली ताकद कायम ठेवली आहे. शिवसेना शिंदे गट व शिवसेना उबाठा गट आणि अपक्ष उमेदवारांनी काही जागांवर धक्कादायक विजय मिळवत प्रस्थापित समीकरणांना सुरूंग लावला आहे. 


 
Top