धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषद गट व 110 पंचायत समिती गणाचा निवडणुकीचा निकाल लागला असून, यामध्ये जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळाले आहे. 55 पैकी 40 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व राहणार आहे. 

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 55 व पंचायत समितीच्या 110 जागेसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी प्रत्येक तालुकावाईज मतमोजणी केंद्रात करण्यात आली आहे. सायंकाळी हाती आलेल्या बातमीनुसार जिल्ह्यात 55 पैकी  भाजपला 19, शिवसेना शिंदे गटा 15, राष्ट्रवादी अजित पवार गट 6, तर शिवसेना ठाकरे गट 7, काँग्रेस पक्षाला 3 जागेवर समाधान मानावे लागले. तर 4 अपक्ष निवडून आले आहेत. जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समाजावादी पार्टीने आपले खाते उघडले आहे. समाजवादी पार्टीचे तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ जिल्हा परिषद गटातून सिमा माडजे विजयी झाल्या आहेत. महायुतीचे संख्याबळ जास्त असले तरी महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे शिंदे शिवसेनेचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चांगले राजकीय संबंध असले तरी जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय एकत्र येवून लढल्यामुळे आमदार सावंत यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात एका शेतकरी मेळाव्यात मोठे वक्तव्य केले होते. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवडताना महायुती एकत्र राहिल असे सांगता येत नाही. त्यामुळे भविष्यात काहीही बदल होवू शकतात. असे म्हणावे लागेल. 


 
Top