धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव भारत स्काऊट गाईड जिल्हा मेळावा शिक्षण विभाग नरेंद्र आर्य विद्यालय अपसिंगा व जिल्हा कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने अपसिगा तालुका तुळजापूर येथील नरेंद्र आर्य विद्यालय अपसिंगा येथे दिनांक 9/2/2026 ते 11/2/2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचे उद्घाटन दिनांक दुपारी ठीक 4.00 वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आले कार्यक्रमाचे पाहुणे उद्घाटक धाराशिव जिल्हा परिषदेचे ॲडिशनल सीईओ निलेशची काळेसाहेब, स्काऊट जिल्हा आयुक्त तथा धाराशिव जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय श्री नागेश मापारी साहेब, नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळ आपसिंगा चे अध्यक्ष शिवाजीराव सांजेकर, उपाध्यक्ष उमेश भोसले सदस्य कल्याण तोडकरी, नरेंद्र आर्य विद्यालय अपशिंगचे मुख्याध्यापक जयराज सूर्यवंशी यांचे अपसिंगा येथील स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याकडे ढोल ताशाच्या गजरात व आकर्षक लेझीम पथकाच्या माध्यमातून आगमन झाले. मिळण्याचे उद्घाटन स्काऊट गाईडचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून मान्यवराच्या हस्ते करण्यात आले यानंतर स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय धाराशिव चे जिल्हा संघटक आदरणीय श्री विक्रांत देशपांडे यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर स्काऊट जिल्हा आयुक्त तथा शिक्षणाधिकारी मापारी साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर कब बुलबुल व स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर काही गीते साजरी केली तदनंतर नरेंद्र आर्य शिक्षण संस्था अध्यक्ष शिवाजीराव सांजेकर यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे कौतुक केले. शेवटी शेवटी ॲडिशनल सीईओ श्री काळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिवेची जान व्हावी यासाठी असे मिळावे आयोजित केले जातात असे सांगितले. कार्यक्रमाची सांगता संजय पोतदार यांनी आभार प्रदर्शन करून करण्यात आली. त्या मेळाव्यासाठी एकूण 22 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून एकूण 450 विद्यार्थी सदर मेळाव्यास खेळीमेळीच्या वातावरणात उपस्थित आहेत. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी रीतसर गाईड पद्धतीने स्काऊटच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊट जिल्हा कार्यालय धाराशिव चे जिल्हा संघटक विक्रांत देशपांडे सर व जिल्हा मेळावा प्रमुख आदरणीय दिलीप चौधरी सर, गाईड मेळावा प्रमुख श्रीमती वटणे मॅडम व गाईड प्रशिक्षण आयुक्त श्रीमती सविता पांढरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्हान्स पार्टी म्हणून शुभांगी पाटीलव विविध शाळेतील शिक्षकांनी तसेच नरेंद्र आर्य माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या या तीन दिवसात विविध शाळेतील विद्यार्थी एकत्रित राहून तंबूत निवास करून एकमेकांसोबत जेवण करतात गप्पागोष्टी करतात खेळतात व वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगती बरोबरच सामाजिक बांधिलकी सांस्कृतिक देवाणघेवाण इत्यादी गुणांची वाढ होते . मेळावा यशस्वी करण्यासाठी किरण वाघमारे. संजय पोद्दार सुरेश वाघमोडे वैजनाथ पाटील नागेश ढगे महादेव कुंभार उषा सर जे मॅडम ,सलीम शेख,कसबे सर, कस्पटे सर इत्यादीने परिश्रम घेतले अशी माहिती स्काऊट जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा श्री जयपाल शेरखाने सर यांनी दिली आहे.
