भूम (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यावर्षी अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव मोठया उत्सवात देशाची राजधानी दिल्ली येथे साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याभर तयारीचा आढावा रासपचे महाराष्ट्र राज्य सचिव ज्ञानेश्वर सलगर हे घेत आहेत.
याचा आढावा घेण्यासाठी भूम येथे रासप च्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सलगर व पाटील यांनी सांगितले कि, धाराशिव जिल्ह्यातून प्रतिवर्षापेक्षा यावर्षी जास्त संख्येने धनगर समाज बांधव व रासपचे हजारो पदाधिकारी दिल्लीला जयंती उत्सवासाठी जाणार आहेत. हा उत्सव दिल्ली येथे शनिवार दिनांक 31 रोजी सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या हजेरीत संपन्न होणार आहे. भूम येथील बैठकीस रासपचे मराठवाडा अध्यक्ष आश्रुबा कोळेकर,महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य नानासाहेब मदने,जिल्हाध्यक्ष ऍड विकास पाटील,उपाध्यक्ष पंडित मारकड,भूम तालुका अध्यक्ष संतोष हराळ,भूम तालुका संपर्क प्रमुख बंडू लोखंडे,गजानन सोलंकर,विधी तालुकाध्यक्ष किशोर डोंबाळे,रामदास हाके यांच्यासह पदाधिकारी व धनगर समाज बांधव हजर होते.