धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी नुकत्याच निवड झालेल्या सिद्धिविनायक समूहाचे संस्थापक दत्ता कुलकर्णी यांचा सत्कार रुपामाता उद्योग समूहाच्या समर्थनगर येथील कॉर्पोरेट कार्यालयात संपन्न झाला. हा सत्कार भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अँड. व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते करण्यात आला.

दत्ता कुलकर्णी यांनी धाराशिव जिल्ह्यात सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आपला ठसा उमठवला असून आता राजकीय नेतृत्वाच्या माध्यमातून विकासाला चालना देणार असल्याचा विश्वास अँड. गुंड यांनी व्यक्त केला. या प्रसंगी अँड. नितीन भोसले, रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अँड. अजित गुंड, रुपामाता मल्टीस्टेटचे कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद खांडेकर, अर्बनचे कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले तसेच भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व रुपामाता समूहाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सत्कार समारंभ राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरत असून, भाजप संघटनेच्या बळकटीकरणासोबतच स्थानिक नेतृत्वामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरणार आहे.

 
Top