कळंब (प्रतिनिधी)-  येथील पीएमश्री नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 कळंब येथे शनिवार दि. 19 एप्रिल 2025 रोजी चावडी वाचन तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद नांगरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विनोद कोकाटे, बालाजी क्षीरसागर, सुदर्शन बेलगावकर माता पालक सीमा पाटील, अश्विनी लोहकरे, सुलभा कसपटे, अनुराधा वाघमारे, सबिया शेख, थळकरी इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी चावडी वाचन करताना विविध विषयांच्या पुस्तकांचे प्रकट वाचन करून दाखवले. तसेच फळ्यावर उपस्थितांसमोर गणिती क्रिया करून दाखवल्या. 

यानंतर शाळेतील विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन सत्कार आणि गुणगौरव करण्यात आला. यामध्ये उत्कर्ष सुदर्शन बेलगावकर, हर्षवर्धन लोहकरे, प्रज्ज्वल जाधवर, श्रद्धा वाघमारे, कुशाबा क्षीरसागर, अनुष्का कसपटे, अंजली कोकाटे, अधिराज सोनवणे, स्वराज सोनवणे, रुद्र थळकरी,श्रद्धा गुंड, विशाखा दळवे, मोहम्मदतला शेख, प्रशिक टोपे, सोफिया शेख, श्रावणी ननवरे इत्यादी विद्यार्थ्यांनी मंथन, एन. एस. एस. इ.,शिष्यवृत्ती इत्यादी स्पर्धा परीक्षात यश संपादन केल्याबद्दल त्यांना पुस्तक आणि पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा गुणगौरव केला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्यासंबंधीच्या सूचना केल्या. तसेच घरातील व्यसनाधीन असलेल्या व्यक्तींना व्यसनाधीनतेपासून परावृत्त करण्यासाठी प्रेरित करण्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका गीताश्री नागटिळक यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहशिक्षक विशाल वाघमारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद नांगरे, शिक्षक वृंद रमेश चव्हाण, प्रशांत सलगरे, अमोल चव्हाण, विनोद राऊत, सोनाली पाटील,  सयाराणी कराड, गिताश्री नागटिळक सेविका सोनाली हौसलमल इत्यादींनी परिश्रम घेतले.

 
Top