तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरी तुळजापूरच्या पायथ्याशी असणाऱ्या सिंदफळ शिवारातील डोंगरावर पाणी नसलेल्या दगडधोंडे, कुसळीचा रानावर देविचे पुजारी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी शेती करीत राजकारण केले. यांनी जवळपास  दहा एकर पैकी नऊ एकरवर रानावर सेंद्रिय पध्दतीने पिकवलेला आंबा व एक एकरवर सफरचंद बाग फुलवली आहे.

सदरील भाग डोंगरी त्यात दोन विहरी पाडल्या. पाण्याचा ठणठणाठ तरी त्यांनी जिद्दीने तीन बोअर मधुन दोन इंची पाण्यातुन दहा एकर वर आंबा व सफरचंद बाग फुलवली आहे. सध्या या बागेतील झाडे आंबा व सफरचंद बहरुन गेली आहेत. आंबा बागेसाठी माळीनगर येथुन पाच वर्षाचे सातशे रुपये किमतीचे रोपे आणले. तर नगर येथुन 45 अंश सेल्यियस तापमानात येणारे सफरचंद रोप हरनामसिंग 909 हा वाण 800 रुपया प्रमाणे आणले. शंभर रोपे आणले होते. तीस जळाले, आता सत्तर सफरचंद झाडांना फळ लागले आहे. आंबा, सफरचंद फळास एकरदीड लाख खर्च येतो. पहिले पाच वर्ष फळ घेता येत नाही. नंतर माञ पसतीस चाळीस वर्ष फळ घेता येते. सफरचंदला थंड वातावरण लागते म्हणून आजबाजुला आंबा झाडे लावले आहेत. सध्या आंबाचे एकुण 1300 व सफरचंदचे 70 झाडे आहेत.सदरील आलेला आंबा व सफरचंद सेंद्रिय पध्दतीने पिकवल्याने याची चव अवोट व गोड आहे.   


सेंद्रिय खत स्वनिर्मिती !                   

सेंद्रिय खत तयार करण्यासाठी 200 लिटर पाणी, 25 किलो गाईचे शेन, 5 लिटर देशी गाईचे गोमुञ, 5 लिटर शिळे ताक, 2 किलो काळा गुळ, 2 किलो हरभरा बेसन पीठ याचे मिञण करुन ते आठ दिवस रोज सकाळ, संध्याकाळी “ ढवळायाचे नंतर एका झाडाला पाच लिटर हा खत द्यायचा. दर महिन्याला हा खताचा डोस द्यायचा. सेंद्रिय पध्दतीने पिकवलेला आंबा काढल्यानंतर वीस दिवस चांगला राहतो.


नैसर्गिकपणे पिकवला जातो आंबा !

आंबा पाढाला आला कि घरी आणायाचा, चार दिवस बंदीस्त खोलीत नैसर्गिकपणे पिकवुन मग विकायाचा. आंबा सेंद्रिय असल्याने ग्राहक घरी चालुन येते आहे. तुळजापूर बरोबर धाराशिव सह अनेक भागातुन ग्राहक येथे येत आहेत.


सेंद्रिय शेती सोन्या सारखी !                      

शेती करताना प्रामाणिकपणे करा सेंद्रिय पध्दतीने शेती केली तर काळी आई ओटी भरल्यानंतर तुमच्या पदरात सोने टाकणार. सेंद्रिय शेती करताना प्रामाणिकपणे शेती केली तर निश्चित पैसा मिळतो. पण आपली इच्छा शक्ती गरजेचे असते. रासायनिक पध्दतीने शेती करुन शेतीचे व आपले नुकसान करुन घेऊ नका. असे आवाहन शेतकरी बाळासाहेब शिंदे व पुत्र श्रीनाथ शिंदे यांनी केले आहे.

 
Top