धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय मजदूर संघ प्रणित डाक कर्मचारी संघ धाराशिव विभाग, भारतीय ग्रामीण डाक कर्मचारी संघटनेची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय डाक कर्मचारी संघ अध्यक्ष व्ही. व्ही. गोवर्धन तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्कल सचिव राजकुमार आतकरे भारतीय ग्रामीण डाक कर्मचारी संघ महाराष्ट्र गोवा यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना भारतीय ग्रामीण डाक कर्मचारी संघटना महाराष्ट्र आणि गोवा सर्कल सचिव राजकुमार अतकरे यांनी धाराशिव विभागातील जास्तीत जास्त ग्रामीण डाक सेवकांनी या संघटनेत सहभागी व्हावे, आगामी काळात ग्रामीण डाक सेवक यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्राचे संघटन मंत्री विजयकुमार वाघमारे, भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सचिव विकास गाडेकर, सहसचिव अमोल जाधव आणि भारतीय डाक कर्मचारी संघ धाराशिव वर्ग 3 चे संदीप कुलकर्णी आणि रवींद्र देडे, सचिव डाक कर्मचारी संघ पोस्टमन हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले तर आभार संदीप कुलकर्णी यांनी मानले.