तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील विविध राज्यपातळीवरील पुरस्कार प्राप्त आलियाबाद ग्रामपंचायतचे चुकीचे आरक्षण पडल्याने ते बदलुन देण्याची मागणी तहसिलदार यांच्याकडे निवेदन देवुन केली. 

तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आलीयाबाद ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण अनुसुचित जातीसाठी पडले आहे. मात्र हद्दीत गावात एकही अनुसुचित जातीचा मतदार राहत नसुन घर ही नाही. येथील सर्व मतदार घरे हे बंजारा समाजाची आहेत. तरी 2025-2030 या कालावधीसाठी जाहीर करण्यात आलेले अनुसुचित जाती आरक्षण रद्द करावे. असे निवेदनात म्हटले आहे. या प्रकारामुळे आरक्षण प्रक्रिया बाबतीत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.


 
Top