तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील जनतेला सुखसमृदी लाभू दे त्यांना निरामय आयुष्य दे असे साकडे घातल्याचे स्पष्ट केले  देविदर्शन  घेतना अलौकीक क्षण अनुभवास मिळतो,असे प्रतिपादन   राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी  गुरुवार दि. 17 एप्रिल रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात सहकुंटुब श्रीतुळजाभवानी मातेची कुलधर्म कुलाचार करुन मनोभावे दर्शन घेतले. श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर पञकारांशी संवाद साधताना म्हणाले, मागील पंचेचाळीस वर्षापासून नित्यनियमाने सहकुंटुंब देवीदर्शनार्थ येतो. येथे आलो कि माझासाठी काहि मागत नाही. पण महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी साकडे घालतो. यावेळी महाराष्ट्रातील जनतेला सुखसमृदी लाभू दे त्यांना निरामय आयुष्य दे असे साकडे घातल्याचे स्पष्ट केले.  देविदर्शन घेतना अलौकीक क्षण अनुभवास मिळतो. यावेळी राजकिय प्रश्न विचारला असता त्यावर भाष्य करणार नसल्याचे म्हणाले. यावेळी आपणास कँबिनेट व दादांना मुख्यमंत्री मिळण्या बाबतीत साकडे घातले का असा प्रश्न विचारला असता आम्हाला आपोआप मिळते. आम्ही जनतेत काम करणारी शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेवर चालणारी मंडळी आहोत असे स्पष्ट केले. यावेळी महेंद्र धुरगुडे, श्रीकृष्ण सुर्यवंशी, गोकुळ शिंदे, महेश चोपदार उपस्थित होते.

 
Top