तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. मंत्री जाधव यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामासंदर्भात यावेळी माहिती घेतली. श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळाल्याच्या भावना जाधव दांपत्यांनी व्यक्त केल्या. मंदिर संस्थानच्या वतीने जाधव दांपत्यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदीर संस्थानचे अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.