कळंब (प्रतिनिधी)-  कळंब तालुक्यातील लोहटा येथील कीर्तनकार तथा प्रवचनकार हभप चंद्रसेन महाराज अडसूळ यांचे गुरुवारी दि. 17 एप्रिल 2025 निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. गावातील शेतात त्यांच्यावर शुक्रवारी दि. 18 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी उपचारासाठी त्यांना मुरुड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी गेली 50 वर्ष प्रबोधनाचे काम केले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली सुन- नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सत्यनारायण लोमटे पाटील यांचे ते सासरे होत.

 
Top