धाराशिव (प्रतिनिधी)- नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्र कंपनीला काँग्रेसचे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पक्षाच्या माध्यमातून 90 कोटी रुपये दिले होते. हा पैसा सर्वसामान्य जनतेचा असल्याने फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यांना जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टात अपील करून याचिका रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ते अपील नामंजूर करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या सुचनेनुसार आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली 17 एप्रिल रोजी धाराशिव येथे आंदोलन करण्यात आले. 

गांधी घराण्याने जनतेची फसवणूक केली असून, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली. या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपने असा इशारा दिला की, देशात कायदा व सुव्यवस्था सक्षम आहे आणि गांधी घराणे सामान्य जनतेची फसवणूक करत आहे, याला यापुढे पाठीशी घातले जाणार नाही. पुढील काळात भाजप अशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेतही देण्यात आले. या प्रसंगी आंदोलनासाठी भाजप शहराध्यक्ष अभय इंगळे,विलास लोंढे,सरचिटणीस सचिन लोंढे,हिंमत भोसले, तालुका अध्यक्ष अजित खापरे, शहर अध्यक्ष प्रसाद मुंडे, रोहित देशमुख, प्रमोद बाचाटे ,विशाल पाटील, सुनील पनगुडवाले, अभिजीत पतंगे, जयसिंग गायकवाड, अभिषेक कोळगे, अर्जुन पवार ओमकार देवकते, नवनाथ सोलंकर,सम्यक माळाले व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top