धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्हा विज्ञान मंडळ सलग्न महाराष्ट्र राज्य विज्ञान महामंडळाच्यावतीने देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय डॉ सी.व्ही. रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार - 2025 आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
लोहारा तालुक्यातील हाराळी (तोरंबा) येथील ज्ञानप्रबोधिनी विद्या मंदिरात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूम तालुक्यातील अंतरगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक इंगळे यांना हाराळी (तोरंबा) येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यामंदिरात हा पहिला पार पडला. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ दयानंद जटनुरे, महाराष्ट्र राज्य विज्ञान मंडळाचे राज्याध्यक्ष दिनेश पवार, रवि नरहिरे, अभिजीत कापरे केंद्रप्रमुख आदींच्या उपस्थितीत इंगळे यांचा सन्मान करण्यांत आला. या या कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.