धाराशिव (प्रतिनिधी)- उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग उमरगा सदाशिव शेलार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा समोरील बाजुस असलेल्या ड्रिम हाऊस कॅफे मध्ये आलेल्या एक काळा शर्ट घातलेल्या इसमाने त्याचे कमरेमध्ये एक पिस्टल बाळगलेली आहे. या माहितीवरून पोलिस पथकाने ड्रिम हाऊस कॅफे मधून बाहेर येताच पिस्टल सह सदर इसमास पकडले. सदर इसमाजवळ अडीच लाख रूपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त करून वाहनासह आरोपीस जेरबंद केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांना सदर माहिती मिळताच अधिकारी व अंमलदार यांनी छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा समोरील बाजूस असलेल्या ड्रिम हाऊस कॅफे मध्ये पंचासह गेले. कॅफेच्या वरच्या मजल्यावरून एक काळा शर्ट घातलेला इसम हा खाली उतरून कॅफे समोर लावलेल्या कार क्र. एमएच-25 एबी-6279 जवळ गेले असता त्यास ताब्यात घेतले. त्याचे नांव गांव विचारले असता त्यांने त्याचे नांव सुशील संतोष शहापुरे रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव असे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक 25 हजार रूपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व 04 जिवंत राऊंड मिळुन आले. तसेच त्याचे ताब्यातील कार क्र. एमएच-25 एबी-6279 ची झडती घेतली. सदर कारचे पाठीमागील डिक्कीमध्ये 3 हजार 500 रूपये किमतीचे 06 कोयते व 01 सुरा असे अवैध हत्यार विना पासपरवाना बाळगल्याचे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. देशी बनावटीचे 01 पिस्टल, 04 जिवंत राऊंड, 06 कोयते, 01 सुरा व वापरलेली कार क्र. एमएच-25 एबी-6279 एकुण 2 लाख 53 हजार 500 रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द पोलिस स्टेशन उमरगा येथे गु.र.नं. 222/2025 कलम 3/25, 4/25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला असुन पुढील तपास सपोनि पांडुरंग कन्हेरे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धाराशिव संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. अश्विनी भोसले, पोउपनि अनुसया माने, पोहेकॉ संतोष बोयणे, पोहेकॉ संतोष सोनवणे, पोना महेश अवचार, पोकॉ शिवराज थोरे, पोकॉ आनंद कांबळे, पोकॉ बालाजी जाधव यांच्या पथकाने केली आहे.