तुळजापूर (प्रतिनिधी)- डीआरडीओचे महासंचालक व ब्रह्मोसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयतीर्थ आर. जोशी यांनी दि. 19 एप्रिल रोजी सायंकाळी व आज सकाळी 20 एप्रिल रोजी श्री तुळजाभवानी देवींची अभिषेक महापूजा केली.

डॉ. जोशी हे दि. 19 एप्रिल रोजी सायंकाळी श्री तुळजाभवानी देवींच्या अभिषेक महापूजे करिता आले असता तहसीलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी त्यांचे मंदिर संस्थानच्या वतीने स्वागत केले. डॉ. जोशी हे उत्कृष्ट शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी देशाच्या सामरिक क्षेपणास्त्र प्रणालीचे डिझाईन, विकास, धोरणात्मक नियोजनात नेतृत्व प्रदान केले आहे. डॉ. जोशी यांचे अग्रगण्य जर्नल्समध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. डॉ. जोशी हे भारत सरकारच्या स्ट्रॅटेजिक मटेरियल पॉलिसीचे सचिव म्हणूनही काम पाहत आहेत.

अभिषेक महापूजे नंतर श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन डॉ. जोशी यांचा मंदिर संस्थानच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ, अभिजीत तेरखेडकर, सुरक्षा निरीक्षक ऋषभ रेहपांडे, अक्षय साळुंखे, नितीन भोयर, पवन पांडे व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top