धाराशिव (प्रतिनिधी)- दि.२८ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीला दहा वर्षे पूर्ण होत आहे.या दशकपूर्तीच्या औचित्याने धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथील सभागृहात सेवा हक्क दिन कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.शासनाने दिलेल्या सूचनेनुसार हा दिवस मोठ्या जनसहभागासह साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५, राज्य सेवा हक्क आयोग व 'आपले सरकार' पोर्टलमार्फत मिळणाऱ्या ऑनलाईन सेवांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला पालकमंत्री,खासदार,विधान परिषदेचे  व विधानसभेचे सदस्य यांची उपस्थिती राहणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात जनजागृती मोहीमा, कार्यशाळा व विविध उपक्रम राबवले जाणार असून,नागरिकांना सेवा हक्कांच्या संदर्भातील माहिती अधिक व्यापकपणे दिली जाणार आहे.या उपक्रमाद्वारे शासनाच्या कार्यक्षम सेवांबाबत लोकांमध्ये विश्वास वाढविण्याचा उद्देश आहे.

 
Top