धाराशिव (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ दि. 25 एप्रिल 2025 रोजी सहाय्यक निबंधक माधव अंबिलपुरे, सभापती राजेंद्र बाळासाहेब पाटील, उपसभापती शेषराव चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

आरोग्य शिबीर यशस्वीरित्या संपन्न करण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी डॉ. स्वप्निल सांगळे, अनुजा कंदले, डॉ. शितल पिसाळ, डॉ. अनुभूती दीक्षित, डॉ श्रेयती कुमार गावडे, डॉ पठाण सनीला समाजसेवा अधीक्षक सय्यद खय्युम व आरोग्य शिक्षक शेख अल्लाउद्दीन यांनी मोफत आरोग्य शिबिरासाठी विशेष मेहनत घेतली.

मुख्यमंत्री यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करण्या च्या सूचनेनुसार कार्यक्रम राबविण्यात आला. त्यावेळी सर्व सन्माननीय  संचालक मंडळ व समितीचे सचिव एस. डी. माने सर्व आडते व्यापारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 
Top