कळंब. (प्रतिनिधी)- स्त्री शिक्षणाचे जनक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा उचित
गौरव व्हावा तसेच त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने कळंब शहरातील तहसील कार्यालयासमोरील चौकाचे महात्मा फुले चौक असे नामकरण करण्याची मागणी कळंब शहर व तालुक्यातील समस्त महात्मा फुले प्रेमींच्या वतीने मंजुषा गुरमे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद कार्यालय कळंब यांना दिलेल्या निवेदनात ( दिनांक 21 एप्रिल ) रोजी करण्यात आली आहे
कळंब शहरात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे चौक अस्तित्वात आहेत. थोर समाजसेवक आणि स्त्रियांच्या शिक्षणाचे उद्धारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने शहरात एकही चौक नाही. महात्मा फुले यांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा यासाठी तहसील कार्यालयासमोरील चौकाला जर महात्मा फुले चौक असे नाव दिले तर त्यांच्या कार्याचा उचित गौरव होईल यासाठी नगरपरिषदेचा ठराव घेवुन चौकास अधिकृत महात्मा फुले चौक कळंब असे नाव देण्यात
यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या मागणीस कळंब शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे याप्रसंगी टी.जे. माळी, हरिभाऊ कुंभार , प्रा. राजेंद्र खडबडे , अरुण माळी, रवी गोरे,माधवसिंग राजपूत, शहाजी शिरसाट ,दीपक माळी, रवी चराटे,अशोक माळी, सचिन डोरले, अजय यादव, शिवाजी माळी यांची उपस्थिती होती.