धाराशिव (प्रतिनिधी)- केशेगाव ता धाराशिव गावातील सुपुत्र वाघाळे गुरुनाथ श्रीशैल्य यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मैलाचा दगड गाठत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. 

“उस्मानाबाद जिल्ह्यातील महिलांचा मानवी विकास निर्देशांक : शेतकरी व अशेती क्षेत्रातील तुलनात्मक अभ्यास”  या विषयावर त्यांनी सखोल आणि  स्तवाधिष्ठित संशोधन केले आहे. त्यांच्या या अभ्यासामध्ये ग्रामीण भागातील महिलांच्या शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य व सामाजिक स्तरावर होणाऱ्या विकासाचा अभ्यास करून तुलना करण्यात आली आहे.

या संशोधनासाठी डॉ. बी. डी. अवघडे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले. संशोधन प्रक्रियेदरम्यान अनेक तज्ञ प्राध्यापक, सहकारी व कुटुंबियांनी त्यांना मानसिक, बौद्धिक व भावनिक आधार दिला. गावकरी, नातेवाईक, शिक्षक व सहकारी वर्गातून त्यांच्यावर अभिनंदन होत आहे. त्यांचे हे यश भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

 
Top