धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ कार्यक्रम अंतर्गत मौजे.वाघोली ता.जि.धाराशिव येथे आज दि.२५/०४/२०२५ रोजी शेतकरी,गावकरी तसेच शाळकरी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी मा.उपविभागीय अधिकारी श्री.स.शि.पाटील यांनी कार्याक्रमाची प्रस्तावना केली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित असणारे धाराशिव पाटबंधारे मंडळ, धाराशिव चे अधीक्षक अभियंता मा.श्री.विजय थोरात साहेब, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी सरपंच वाघोली ग्रामपंचायत श्री.काशिनाथ बाबा मगर लाभले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित असणारे धाराशिव पाटबंधारे मंडळ, धाराशिव चे अधीक्षक अभियंता मा.श्री.विजय थोरात यांनी उपस्थित ग्रामस्त, शेतकरी, व पाणीवापर संस्थेचे सर्व सभासद यांना जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच उपस्थितांना जलसंवर्धनाचे महत्व पटवून दिले.तसेच भविष्यात पाण्याविष्याची गंभीरता याबद्दल जागृत करून त्यावरील उपाय करून ग्रामस्थाना मार्गदर्शन केले.उपस्थित शेतकऱ्याचे ओढा व नाले यामधील गाळ काढणे, पाणी वापर,व जलव्यवस्थापन तसेछ पिक पद्धती, पाणी देण्याच्या आधुनिक पद्धती, गाळ्मुक्त धरण व गाळयुक्त जमीन याबाबत शेतकऱ्यासोबत चर्चा केली. पाणीपट्टी, व शिल्लक पाणीसाठा तसेच सहकारी पाणीवापर संस्थेला येणाऱ्या अडचणी तसेच शेतकऱ्याच्या समस्या समजावून घेऊन त्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
यानंतर शिवपार्वती विद्यालय वाघोली येथे अधीक्षक अभियंता मा.श्री.विजय थोरात साहेब यांनी येथील विध्यार्थी व शिक्षकवृंद यांच्याशी जलवव्यस्थापानाविषयी मार्गदर्शन केले.तसेच भविष्यातील पाणी टंचाई बद्दल जागृत करून त्या वरील उपाययोजना बद्दल माहिती देऊन विधार्थासोबत जलप्रतीज्ञा दिली.
याच्यानंतर जि.प.प्र.शाळा वाघोली येथे जाऊन वृक्षारोपण केले. वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. वाढत्या प्रदूषणामुळे वातावरणात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन तयार करतात. त्यामुळे पर्यावरण संतुलित राहते. वृक्षलागवड केल्यामुळे मातीची धूप थांबते, जलसंधारण होते आणि जैवविविधतेला संरक्षण मिळते. प्रत्येकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावावे आणि त्याची निगा राखावी असे आहावन केले.
यावेळी कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता श्री.दिनेश खट्टे, कार्यकारी अभियंता श्री.प्रवीण चावरे, श्री.संजय थोरात, श्री. संजय खडके, नितीन चव्हाण उपसरपंच,प्रवीण शिंदे, ओमप्रकाश मगर माजी सभापती, सतीश खडके,चंद्रशेखर उंबरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी श्री.धर्मराज पाटील चेअरमन लोकमंगल सहकारी पाणी वापर संस्था वाघोली यांनी आभार मानले.