परंडा (प्रतिनिधी)- परंडा व तुळजापूर येथील डृग्ज तस्करीबाबत भाजपाचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. ड्रग्ज तस्करीची वस्तीस्थिती व भीषण वास्तव यावेळी त्यांनी मुख्यमंत्री यांना सांगितले. ड्रग्ज तस्करीचा बिमोड करा असे आदेश मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असुन माजी आमदार ठाकूर यांनी त्यानंतर सोलापुर व धाराशिव पोलीस अधिक्षक यांना संपर्क साधला. तुळजापूर व परंडा या दोन्ही ठीकाणी दाखल ड्रग्ज प्रकरणात लक्ष घातले असुन पाठपुरावा सुरु केला आहे. यांचे समुळ उच्चाटन आपण करणार असल्याचे माहिती भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला भाजपा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. झहीर चौधरी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.संतोष सुर्यवंशी उपस्थित होते. पुढे बोलताना ठाकूर म्हणाले की, बार्शी ड्रग्ज तस्करीत 10 आरोपी निष्पन्न झाले असुन त्यातील 8 जण हे परंडा येथील आहेत. तर 2 जण बार्शी येथील आहेत. बार्शी पोलीसांनी 7 जणांना अटक केली असुन 3 आरोपी फरार आहेत. ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे असुन परंडा येथील अनेकजण रडारवर आहेत. तुळजापूर येथे 36 आरोपी निष्पन्न झाले असुन 14 जण अटकेत आहेत. तर 22 जण फरार आहेत ड्रग्ज तस्करीमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असुन तस्करावर कारवाई होणे गरजेचे आहे. असे माजी आमदार ठाकूर म्हणाले.
परंडा येथील असद हसन देहलुज, मेहफुज महंमद सय्यद, वसीम इसाक बेग, जावेद नवाबुद्दीन मुजावर व हसन चाऊस, या 5 आरोपींना अटक केली आहे. तर जमीर अन्सार पटेल, सिरफराज उ़र्फ गोल्डी अस्लम शेख या 2 जणांचा समावेश आहे. उर्वरीत 3 आरोपी फरार असुन पोलीसांनी नावे गोपनीय ठेवली आहेत. 20 ग्रॅम वजनाचे 10 पुड्यासह पोलीसांनी दि.18 एप्रिल रोजी 3 जणांना अटक केली होती. त्यांनतर 3 जणांना अटक केली. असद देहलुजकडे 9.19 ग्रॅम ड्रग्ज पुड्या व पिस्टल, महेफुज शेख कडे 5.73 ग्रॅम ड्रग्ज 2 पुड्या व सरफराज उर्फ गोल्डी कडे 5.12 ग्रॅम 3 पुड्या, असे 20 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले. ड्रग्ज कुठुन आणले होते व कोणाला दिले जाणार होते व पुरवठादार कोण, गावठी पिस्टल कोणाकडुन आणले व त्याचा वापर त्याचा वापर इतर गुन्ह्यात झाला का, आरोपीचे मोबाइल, कॉल डिटेल, सोशल मीडिया यासह अन्य बाबी तपास, अम्ली पदार्थ व शस्त्र विक्रिचा व्यवहार, इतर साथीदार याचा तपास पोलिस करीत असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागिय पोलिस अधिकारी जालिंदर नाकुल, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने हि कारवाई केली. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही असे माजी आमदार ठाकूर यांनी यावेळी सांगितले.