तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर बनला होता या पार्श्वभूमीवर पापनास नगर, विवेकानंद नगर व एरसीटी कॉलनी परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी योग्य व सोयीस्कर सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी नवीन सुसज्ज स्मशानभूमी उभारण्याच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे यांनी प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.
दीर्घकाळापासून या परिसरात स्मशानभूमीची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विजय गंगणे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित स्थानिक प्रतिनिधींनी पाहणी करून परिसराची माहिती घेतली. यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या |विजय गंगणे समोर मांडताना मणाले कि. सध्या अंत्यसंस्कारासाठी लांब अंतरावर जावे लागत असून वेळ, खर्च आणि मानसिक तणाव वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
वाढती लोकसंख्या व नागरी विस्तार लक्षात घेता स्वतंत्र व सुसज्ज स्मशानभूमी उभारणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. नवीन स्मशानभूमीत पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, स्वच्छता, अंत्यसंस्कारासाठी शेड, बसण्याची व्यवस्था तसेच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या पाहणीवेळी ग, स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नवीन स्मशानभूमी उभारणीसाठी एकमताने पाठिंबा दर्शविला. गंगणे ही सकारात्मक भूमिका घेत योग्य जागेची निवड करून लवकरच प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. नवीन स्मशानभूमी उभारली गेल्यास पापनास नगर, विवेकानंद नगर व एस टी कॉलनी परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागणार असून, उर्वरित तीन स्मशानभूमीवरचा ताण कमी होणार आहे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. यावेळी जयकुमार पांढरे बालाजी नाईकवाडी भैय्या शिंदे उपस्थित होते
स्मशानभूमी लवकरच उभारली जाणार - विजय गंगणे
याप्रकरणी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे म्हणाले की स्मशानभूमीसाठी चार वर्षापासून माझे प्रयत्न सुरू होते तसा ठरावही झालेला आहे शेख फरीद जवळ शासकिय गट नंबर 215 येथे भरपूर जागा असून येथे सर्व सोयीन सुसज्जयुक्त अत्याधुनिक पद्धतीचे अशी ही स्मशानभूमी लवकरात लवकर करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे
