धाराशिव (प्रतिनिधी)- समर्थ मंगल कार्यालय धाराशिव येथे नुकताच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ध्येय तरंग स्पर्धा परीक्षांमध्ये विभाग जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावर जिल्हा परिषद आळणी च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्यामुळे ध्येय फाउंडेशन,महाराष्ट्र राज्यच्यावतीने प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दयानंद जटनुरे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव हे उपस्थित होते. तर प्रकाश पारवे शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख सर्व राजाभाऊ गिरी, शेषेराव राठोड, केदारनारनाथ दुधबे, जगदीश जागते, विवेक सरवदे, मुख्याध्यापक सर्वश्री बशीर तांबोळी, बिभीषण पाटील, तानाजी वनकळस, सविता देशमुख, दैवशाला रामगुढे यांची प्रमुख उपस्थिती होती. ईश्वरी गणेश निंबाळकर, तन्वी शंकर यादव, प्रगती दत्ता वीर, शिवन्या ज्ञानेश्वर निंबाळकर, स्वराज सुनील गाडे, स्वराज अण्णासाहेब राऊत, आरोही पांडूरंग कदम, राजकन्या दत्ता वीर, वैष्णवी हरिदास भांडेकर, श्रद्धा गणेश निंबाळकर, माळी राज शहाजी, वीर दिव्या धनंजय, कोरे शिवकुमार मधुकर, राजनंदिनी रंगनाथ देशमुख यांचा सन्मान करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक रजनीकांत तुपारे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला असून, अन्य विद्यार्थ्यांसाठीही तो मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.