धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते इंग्रजी,मराठी भाषेमध्ये व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर माहिती सांगितली. यामध्ये साक्षी एकंडे, सृष्टी भोसले, आदित्य गुंड, पुष्कराज गुंड, प्रियंका माने, चव्हाण,या विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री सुरेश मनसुळे, राजेंद्र सूर्यवंशी हे होते तर प्रमुख पाहुणे जेष्ठ शिक्षक श्री नागनाथ गोरे सर होते, प्रा. नंदनी सूर्यवंशी, वैशाली माळी, नागनाथ गोरे, यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य या संदर्भात माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी दोन्ही शाळेतील शिक्षक श्री सुरेश सूर्यवंशी, अमोल गुंड, बापू शेख, रामचंद्र राख, प्रदीप सूर्यवंशी, भीमराव जावळे हे उपस्थित होते. तसेच दोन्ही शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू शेख यांनी केले.