धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी येथे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर भाषणे केली, तसेच मुख्याध्यापक बशीर तांबोळी, क्रांती मते, वर्ष्या डोंगरे, सुनीता कराड यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रा विषयी व त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशीला म्हेत्रे यांनी केले. तर आभार श्रीमती ढगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.