कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहाचा प्रारंभ 5 एप्रिल शनिवार व सांगता  12 एप्रिल शनिवार रोजी होत आहे.

या सप्ताहात दैनंदिन कार्यक्रमात  काकडा भजन, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, महिला भजन, प्रवचन, हरिपाठ, हरी किर्तन, हरिजागर असे कार्यक्रम संपन्न होत असून नामवंत कीर्तनकाराची कीर्तन सेवा होणार आहे, यामध्ये हभप. ज्ञानेश्वर महाराज बोराडे गोटेगांव, हभप .गणेश महाराज सोनवणे आळंदी देवाची, भागवताचार्य किशोर महाराज मुकुंदराज, हभप. भगवान महाराज  वरपगांव, हभप. संतोष महाराज पानसे पांगरीकर, हभप. दत्तात्रय महाराज आंबीरकर डिकसळ, हभप. नारायण भाऊ महाराज उत्तरेश्वर पिंपरी, प्रवचन सेवा  हभप. शिंदे गुरुजी महाराज, ह प सदाशिव महाराज शिंदे, हभप .बळीराम महाराज कवडे हभप .घनश्याम महाराज रामणाचार्य हभ प. महेश महाराज भोरे, हभप. कुलदीप महाराज शितोळे, डॉ, सुजित महाराज झाडगे यांची आहे. दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता हनुमान जयंतीनिमित्त हनुमान जन्मोत्सव संपन्न होत आहे.  तर दुपारी 4 ते 6 या वेळेत ज्ञानेश्वरी ग्रंथ भागवत ग्रंथ व तुकाराम महाराज गाथा यांची भव्य दिव्य मिरवणूक दिंडी प्रदक्षिणा होणार असून महिला दिंडीचे नेतृत्व मीराताई चोंदे व सर्व महिला भजन मंडळ हे करतील. ज्ञानेश्वरी वाचक हभप. ज्ञानेश्वर महाराज आंबीरकर डिकसळ, सर्व पूजा पुरोहित बंडोपंत जोशी, दिनांक 12 एप्रिल शनिवार रोजी सकाळी 10 ते 12  काल्याचे किर्तन सेवा हभप. ज्ञानसिंधू संदिपान महाराज शिंदे- पाटील अध्यक्ष व परीक्षक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांची आहे. तर  शिवाजी आप्पा कापसे माजी नगराध्यक्ष यांचा महाप्रसाद होईल. या सप्ताहासाठी कीर्तन मंडपातील नियोजन हभप. आबासाहेब शिंदे गुरुजी, चत्रभुज आप्पा चोंदे, मुरलीधर चोंदे, पांडुरंग माळवदे व दक्षिणमुखी हनुमान भजनी मंडळ यांच्याकडे आहे.

 
Top