तुळजापुर (प्रतिनिधी)- 350 वर्षापूर्वीच्या शिवकाळात सुरु झालेली कावड पदयात्रा आजही अखंडपणे सुरु आहे. तालुक्यातील श्रीक्षेञ खंडाळा या गावाला एक प्राचीन परंपरा आहे. या गावची “खंडाळा ते शिखर शिंगणापूर“ ही कावड पदयात्रा शिवकालीन परंपरा म्हणून ओळखली जाते.
शिवकालिन परंपरा असलेल्या मानाच्या कावडचे आज आई तुळजाभवानी मंदिरामध्ये आगमन झाले. परंपरेनुसार खंडाळा येथील मानाच्या कावड आई श्री तुळजाभवानी मंदिराकडून शिखर शिंगणापुरच्या शंभुमहादेवाला मानाचा आहेर (शेला-पागोटे-धोतर) आहेर म्हणुन नेत असतात. त्यासाठी आज श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये मंदिर प्रशासनाकडून शंभु महादेवाकरीता मानाच्या कावडकडे सदरचा आहेर सुपुर्द करण्यात आला. यावेळी मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक अधिकारी अतुल भोसले, देविचे पुजारी धनंजय पाटील तसेच कावडचे मानकरी व खंडाळा गावचे ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%82%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE.jpg)