कळंब (प्रतिनिधी)- शहरातील शिवाजीनगर भागातील एका बंद घराचे कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत सुमारे 2 लाख 7 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना कळंब पोलीस ठाण्याच्या काही हाकेच्या अंतरावर घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक वृत असे की, दिपक  हनुमंत शिंदे (वय 34 वर्षे, रा. शिवाजीनगर, कळंब) यांच्या घरी ही चोरी झाली.  शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे घर दि. 2 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजेपासून ते दि. 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान बंद होते. याच काळात अज्ञात व्यक्तीने त्यांच्या राहत्या घराच्या पत्राच्या (दरवाजा/खिडकीचे) कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला.

घरातून चोरट्याने 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, काही चांदीचे दागिने आणि 4,500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 2 लाख 7 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिपक शिंदे यांनी गुरुवारी दि. 3 एप्रिल 2025 कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.कळंब पोलिसांनी रात्रीच्या गस्तेचे प्रमाण वाढून चोराच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकातून जोर धरत आहे. या घटनेमुळे कळंब शहर व परिसरात नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.


 
Top