धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत शहरातील आटीआयच्या जागेवर बांधण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आयटीआयच्ी इमारत पाडल्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, त्यामुळे जागेचे हस्तांतरण थांबविण्याची मागणी आयटीआय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 

यासंबंधी नागरिकांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था 45 वर्षापासून तुळजापूर रोड येथे कार्यरत आहे. धाराशिव येथे शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. त्यासाठी यापूर्वीच शासकीय आयटीआयची 5.30 हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे. ही जागा म्हणजे आयटीआयचे प्रस्तावित प्रकल्प क्रीडांगण व कर्मचारी वसाहतीची आहे. सध्या संस्थेकडे उपलब्ध असलेल्या जागेपैकी 2.35 हेक्टरवर प्रशासकीय इमारत व कार्यशाळा हे बांधकाम आहे. आयटीआयचे कर्मचारी, आयटीआय प्रशिक्षणार्थी आक्रमक झाले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. हस्तांतरणाची घाई करू नये, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर अतिश सुरवसे, किरण झरकर, श्रीमंत ओव्हाळ, राजकुमार सुतार, बाळासाहेब जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top