भूम:(प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील कर्मवीर परिवार तर्फे समाजातील शैक्षिणक, सामाजिक, सहकार क्षेत्रातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे, शिक्षक वर्ग, पालक वर्ग यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

  यामध्ये एस टी कार्यालयात कार्यरत असलेले अब्दुल शेख यांच्या मुलाने आदिल ने JEE Mains परीक्षेत 98.33 पर्सेंटाइल मिळविल्याबद्दल, तसेच जिल्हा परिषद प्रशाला जवळा (नि) तालुका परांडा येथील प्रवीण आगतराव राऊत याने नेव्ही मर्चंट मध्ये नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले शिक्षक पतसंस्था भूम या संस्थेचे चेअरमन व विस्तार अधिकारी सोमनाथ टकले, व्हाइस चेअरमन जयश्री माळी, संचालक अच्युत मुळे, सुनिल गुंजाळ यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना सोमनाथ टकले म्हणाले की आपण समाजच काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून आपले सामाजिक सहकार शैक्षिणक कार्य करून समाजाची प्रगती करावी. यावेळी जयश्री माळी, गुरुदेव हायस्कूल चे मुख्याध्यापक दत्तात्रय भालेराव, लोकसेवा शिक्षण संस्था सचिव सत्येंद्र मस्कर यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्येंद्र मस्कर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते फैजान काजी, दत्तात्रय भालेराव, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष संजीवन तांबे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ राहुल अंधारे यांनी केले तर आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर कातुरे यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष तोडकरी यांनी केले यावेळी कर्मवीर परिवार सदस्य व शिक्षक संघ संघटना प्रतिनिधी उपस्थिती होती.


 
Top