भूम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा मजूर सहकारी संघाच्या संचालकपदाच्या 9 जागासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने 8 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले आहे. 4 जागा बिनविरोध झाल्या होत्या. भारतीय जनता पार्टीचे परंडा तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव यांच्या पत्नी लताताई जाधव या महिला मतदारसंघातून सर्वाधिक मताने विजयी झाल्या. त्यांचा भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. झहीर चौधरी, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, जिल्हा युवा मोर्चा चिटणीस रामकृष्ण घोडके, ता. सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, डॉ. अमोल गोफणे, बबन चौधरी, मनोज पवार, आदर्श ठाकूर, सागर पाटील, जयंत सायकर तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.