भूम (प्रतिनिधी)- शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव प्रतापजी सरनाईक, माजी मंत्री विद्यमान आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्कप्रमुख सचिन मांजरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख पांडुरंग धस यांच्या पुढाकाराने साजरा झाला.
निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य ही जागतिक आरोग्य दिन 2025 ची थीम आहे. या थीममागे माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याचा विचार करण्यात आला आहे. माता आणि नवजात शिशूचे मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, गर्भधारणेपासून बाळंतपण आणि त्यानंतर ही काही काळ या दरम्यान चांगल्या सेवा पुरवठांची आवश्यकता अधोरेखित करणे, हा यंदाचा उद्देश आहे असे मत वैद्यकीय अधीक्षक डॉ सुजित नाईकल यांनी व्यक्त केले .
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ सुजित नायकल,डॉ. अमोल कुटे दंतरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी आदम शेख सूर्यकांत तटाळे समुपदेशन, सरवदे एम.एल. समुपदेशन, कोल्हे स्टाफ नर्स, गव्हाणे स्टाफ नर्स, तसेच इतर आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
एकनाथ हिरक आरोग्य 60 वर्ष अंतर्गत भूम परंडा वाशी तालुक्यातील जनतेचा सुदृढ आरोग्यासाठी, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील शासकीय विविध योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने तालुक्यातील शेवटच्या घटकातील गरजू रुग्णापर्यंत आरोग्य सेवा पोहचविणार असे प्रतिपादन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख भूम पांडुरंग धस यांनी केले.