धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते कु.सक्षणा सलगर यांचा महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की, कुमारी सक्षणा सलगर यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याला आज मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाले आहे.त्याबद्दल आम्हा धाराशिवकरांना अभिमान वाटतो. कु.सक्षणा सलगर यांनी राजकारणाच्या माध्यमातून बहुजन समाजातील मुलींचे प्रश्न सोडवावेत. महिलांचे सबलीकरण करण्याचा प्रयत्न करावा. या पुढील कार्यासाठी आमच्याकडून आपणाला शुभेच्छा आहेत असेही ते यावेळी म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना सक्षणा सलगर म्हणाल्या की , रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे आदर्श प्रशासक म्हणून सुपरिचित आहेत. प्रशासनामध्ये त्यांचा खूप मोठा हातखंड आहे. अशा महान व्यक्तींचे माझ्यासारख्या मुलीला मार्गदर्शन मिळत असल्यामुळेच मी या पदापर्यंत जाऊ शकले. सत्काराबद्दल यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी धाराशिव जिल्ह्याच्या युवती जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( एस.पी.) श्वेता दुरूगकर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संदीप देशमुख, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मारुती लोंढे आदीसह गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.