धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये स्थापन झालेल्या संस्थेच्या इनोव्हेशन कौन्सिलने दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी बिझनेस मॉडेल कॅनव्हासवरील सत्र या विषयावर एक दिवसाचे वर्कशॉप आयोजन केले होते.
या कार्यशाळेत राजेंद्र कोरे फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ क्रायसालिस आणि आयम्स क्रायसालिस इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट याचे संस्थापक आणि संचालक, पुणे यांनी या विषयावर प्राध्यापक व विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना त्यांनी सत्र उद्दिष्ठे ,व्यवसाय मॉडेलच्या संकल्पना समजून घेणे, समस्या ओळखणे आणि उपाय विकसित करणे, व्यवसाय मॉडेलचे विस्तारीकरण कसे साध्य करायचे हे जाणून घेणे या गोष्टीवर भर दिला. कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाच्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी उस्फुर्तने भाग घेतला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. विक्रमसिंह माने यांनी महाविद्यालयाच्या काही यशस्वी स्टार्टअप सुरू केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे उदाहरणे दिली व महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी महाविद्यालय व व्यवस्थापन निश्चितपणे आपल्या पाठीमागे उभे राहील याची ग्वाही दिली.
यावेळी महाविद्यालयाचे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलचे कन्व्हेनर प्रा.डॉ. सुशीलकुमार होळंबे, महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. गुरुप्रसाद चिवटे, प्रा. किसान डोलारे, डॉ. आर. बी. नन्नवरे सर्व विभाग प्रमुख, स्टुडन्ट कौन्सिल चे सर्व सदस्य यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.