धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने सलग 14 व्या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त काळा मारुती चौक येथून सोमवारी, 14 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुजित ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन भाजपा कार्यकर्ते प्रवीण सिरसाठे यांनी केले होते.या मिरवणुकीचे उद्घाटन माजी मंत्री , भाजपा नेते, बसवराज पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी केले. यावेळी भाजपा नेते व्यंकट गुंड, प्रवीण पाठक ,इंद्रजीत देवकते, गुलचंद व्यवहारे, दिलीप भालेराव, राहुल लोखंडे उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष साहिल माने, उपाध्यक्ष अर्जुन माळाळे, सचिव रोहित माळाळे,कोषाध्यक्ष अमर इंगळे, सहसचिव अनिकेत वाघमारे, टायगर ग्रुप अध्यक्ष बाळा इंगळे उपस्थिती होती. ही मिरवणूक काळा मारुती चौक पोस्ट ऑफिस, संत गाडगे बाबा चौक, या मार्गे निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सांगता झाली.
मिरवणुकीत ‘जय भीम', ‘एकच साहेब...बाबासाहेब', ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो' आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. मिरवणुकीत महिला, पुरूष व युवक निळे व पंचशील ध्वज घेवून बहुसंख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक यशस्वीतेसाठी सागर दंडनाईक, शरद इंगळे, स्वप्नील लोंढे,ईश्वर इंगळे, अभिजीत वाघमारे, अमोल साबळे, दयानंद शिरसाठे, अरविंद सिरसाठे, आदींनी परिश्रम घेतले.