तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्रातील थोर संत वैराग्य महामेरू श्री संत गोरोबाकाका यांच्या वार्षिक यात्रा महोत्सवास 23 एप्रिल पासून प्रारंभ होत आहे
श्री संत गोरोबा काका यांचा 708 वा समाधी सोहळा चैत्र वैद्य दशमी ते अक्षयतृतीया म्हणजे 23 एप्रिल पासून 30 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. .या उत्सवादरम्यान भजन, कीर्तन, प्रवचन, पालखी मिरवणूक, गोपाळकाला असे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रा महोत्सव सोहळ्यात भावीकभक्तांनी सहभागी व्हावे व भव्य कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री संत गोरोबा काका शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे यांनी केले आहे.
यात्रा महोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विनामूल्य वाहन तळाची व पाण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले..23 एप्रिलला महाराष्ट्रातील विविध वारकरी, फडकरी दिंड्यांचे आगमन होणार असून परंपरेप्रमाणे भजन, प्रवचन ,कीर्तन उत्सवास प्रारंभ होणार आहे.
23 एप्रिलला सायंकाळी . ह.भ.प. भाऊसाहेब महाराज गोसावी यांचे कीर्तन होणार असून 24 एप्रिलला पहाटे आमदार राणाजगजितसिंह पाटील व श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर श्री संत गोरोबा काका यांच्या दिंडयासह तेर येथे आलेल्या दिंडयांची नगर प्रदक्षिणा होणार असून सायंकाळी हभप. बाळासाहेब महाराज देहूकर यांचे किर्तन होणार आहे. रात्री काळेगाव व गोरोबा काकांच्या पारंपारिक वारकऱ्यांचा सामुदायिक हरी जागर होणार आहे. 25 एप्रिलला सायंकाळी हभप शंकर महाराज थोबडे यांचे कीर्तन होणार असून 26 एप्रिलला सकाळी आठ वाजता हभप दत्तात्रय महाराज अंबीरकर यांचें किर्तन होणार आहे व श्री संत गोरोबाकाका यांच्या समाधी उत्सव (गुलाल पुष्प उधळण सोहळा) होणार आहे. सायंकाळी हभप. कान्होबा महाराज देहूकर यांचे कीर्तन होणार आहे. 27 एप्रिलला भगवान श्री नरसिंह मंदिर येथे काल्याचे उपस्थिती किर्तन होणार आहे व गोपाळकाला व दिंडी विसर्जन होणार आहे. यात्रा परीसरात दुपारी जंगी कुस्त्या कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. दि.30 एप्रिलला अक्षय तृतीया दिवशी श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रा उत्सावाची सांगता होणार आहे. श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रा महोत्सवाचा भाविक भक्त यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे, निरीक्षक अतुल नळणीकर, व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी केले आहे.