धाराशिव (प्रतिनिधी)- सहकार क्षेत्रातले उदयोन्मुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे धाराशिव सहकारी पतसंस्थेचे चेअरमन स्व. श्रीकृष्ण उर्फ बाळासाहेब अरुण दंडनाईक यांचे 10 एप्रिल 2025 रोजी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय अवघे 48 वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने सहकार क्षेत्रासह तमाम धाराशिवकरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
धाराशिव पतसंस्थेचे चेअरमन म्हणून सहकार क्षेत्रात काम करत असताना शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच प्रतिष्ठित नागरिक म्हणून त्यांची ओळख होती. सहकार क्षेत्रापासूनच त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली होती. त्यानंतर विविध कार्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पश्चात कुटुंबातील आई, वडील, काका, काकू, भाऊ, बहीण, वहिनी, मुलगा आणि मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने दंडनाईक कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.