धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सुधारीत वेतनश्रेणीनुसार थकबाकी परिगणीत करण्यात यावी. असे आदेश आसतानाही अद्यापपर्यंत वरील कालावधीतील सुधारीत वेतनश्रेणीनुसार थकबाकी परिगणीत करण्यात आलेली नाही व संदर्भिय परिपत्रकाचा भंग केलेला आहे. परिपत्रकातील सुचनेनुसार सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांची थकबाकी त्वरीत परिगणीत करण्यात यावी. थकबाकीची रक्कम एकरकमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावी. अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील सेवानिवृत्त एसटी मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाराशिंच्या विभागीय नियंत्रण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विभागीय नियंत्रण अधिकारी यांना शुक्रवार 4 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1 एप्रिल 2020 पासून कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या मुळ वेतनात 6500 रूपये एवढी वाढ करुन वेतनवाढीसह मुळ वेतनात वाढ करुन सप्टेंबर 2024 देय ऑक्टोबर 2024 च्या वेतनात देण्यात आलेली आहे. तसेच एक एप्रिल ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीची थकबाकी समान पाच हप्त्यात सप्टेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत दरमहा मासिक वेतनात अदा करण्यात आलेली आहे.
परंतू दिनांक 01 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2024 या कालावधीत कार्यरत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी अधिकारी यांना वरीलप्रमाणे देयकासाठी पात्र असताना अद्यापर्यंत सुधारीत प्रमाणे देय रक्कमा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे वाढीव उपदान, वाढीव वेतन व शिल्लक रजेच्या रोखीकरणाचा फरक इत्यादी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही.
तसेच 01 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2024 या कालावधीतील सुधारीत वेतनश्रेणीनुसार थकबाकी परिगणीत करण्यात यावी. असे आदेश असतानाही अद्यापपर्यंत वरील कालावधीतील सुधारीत वेतनश्रेणीनुसार थकबाकी परिगणीत करण्यात आलेली नाही व संदर्भिय परिपत्रकाचा भंग केलेला आहे. तरी संदर्भित परिपत्रकातील सुचनेनुसार सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांची थकबाकी त्वरीत परिगणीत करण्यात यावी. थकबाकीची रक्कम एकरकमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी एस. टी.चे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सतीश चव्हाण, सतीश घाडगे,यशवंत देशपांडे, नंदकिशोर वडवले, संजय कदम, हरिश्चंद्र भोसले, राजेंद्र यादव, रविराज कदम, मारुती शिंदे, दिलीप माने, समशेर पठाण, पंडित मोरे, विठ्ठल यमपुरे, अलीम पठाण, राजाभाऊ साळुंखे, आदींच्या सह्या आहेत.