धाराशिव (प्रतिनिधी)- मौजे पाडोळी (आ.) येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय व रूपामता माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव आयोजित “विधी साक्षरता शिबिर“ संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी ॲड. श्री वसंत यादव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर धाराशिव तसेच प्रमुख पाहुणे ॲड. श्री अमोल गुंड मुख्य न्यायरक्षक धाराशिव, ॲड. श्री शशांक गरड सहाय्यक न्यायरक्षक धाराशिव हे उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ॲड. वसंत यादव यांनी कायद्याविषयी व ॲड. अमोल गुंड यांनी ( 2012), ॲड. शशांक गरड यांनी (2009) याबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी जिजामाता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड. व्यंकटराव गुंड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.डी सूर्यवंशी सर, रूपामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनसुळे सर, अमोल गुंड सर, शेख सर, श्रीमती माळी मॅडम व इतर शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, गावकरी उपस्थित होते.
%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF.jpeg)