तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्ष तुळजापूर शहर मंडळ अध्यक्षपदी आनंद कंदले तर तुळजापूर ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी महादेव जाधव यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीपत्र देऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा  दिल्या.

एक  तालुकाध्यक्ष ऐवजी चार मंडल अध्यक्ष करुन तालुकाध्यक्ष यांचा आधिकाराचे विक्रेंद्रीकरण केले आहे. त्यासाठी रविवार दि. 20 एप्रिल रोजी तुळजापूर तालुक्यातील  भाजपच्या चार  मंडल अध्यक्षांची निरीक्षकांच्या देखरेखीत निवडणुक घेवुन निवडी करण्यात आल्या. यात  तुळजापुर मंडल  अध्यक्ष पदी आनंद कंदले यांची निवड  करण्यात  आली.  आनंद कंदले हे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे  निष्ठावंत कार्यकते आहेत येते. नवनिर्वाचीत मंडल अध्यक्षांचा आ पाटील यांनी  सत्कार करुन पुढील कार्यास शुभेछा दिल्या मावळत्या पदाधिकारी चा या कार्यक्रमात सत्कार केला.


 
Top