धाराशिव/तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील अति प्राचीन अशा आर्य चौकातील श्रीराम मंदीरात रामनवमी उत्सव रविवार दि. 6 एप्रिल रोजी पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धाराशिव येथे समर्थ नगर, कसबा पेठे येथील राममंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समर्थनगर मध्ये कीर्तनकार वर्धाताई चाकूरकर यांचे किर्तन झाले.
तुळजापूर मध्ये आर्य चौक येथील श्रीराम मंदीरात प्रभुश्रीरामचंद्र सिता लक्षमण मुर्तीचे पुजन श्रीतुळजाभवानी मंदीरसंस्थान विश्वस्त तथा तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन अरविंद बोळंगे यांच्या हस्ते मंदीर संस्थान तर्फ करण्यात आले. रामनवमी निमित्ताने दुपारी रामनवमी जन्मोत्सव महिला वर्गानी साजरा केला. आज शहरवासियांनी रामफळ उकडलेली दाळ याचा नैवध प्रभुरामचंद्रास दाखवुन साखरेचे हार घालुन गुलाल लावुन मनोभावे दर्शन घेतले. तसेच आपसिंगा, काक्रंबा येथील श्रीराम मंदीरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक स्वरूपात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. येथील अतिप्राचीन अशा आर्य चौकातील श्रीराम मंदीरात रामनवमी उत्सव रविवार दि. 6 मार्च रोजी पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वाशी येथील देशमुख वाड्यातील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. केळेवाडी, कन्हेरी,वाशी येथील भजनी मंडळे यांनी हरिनाम जागर केला. सकाळी दहाच्या देशमुख परिवराच्या वतीने श्रींस अभिषेक करण्यात आला. कार्यक्रमाचे पौराहित्य गोविंद जोशी यांनी केले.यानंतर महाआरती झाली.दुपारी बाराच्या सुमारास श्रींचा जन्म काळ गुलाल, फुले यांच्या उधळणीने संपन्न झाला.यानंतर उपस्थित महिलांनी श्रीरामाचे पाळणे गायी.यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला.सायंकाळी पाचच्या सुमारास भव्य शोभायात्रा काढण्यात आली.यात भाविक स्त्री पुरुष भक्त मंडळी, तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्रीरामांच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला.