धाराशिव (प्रतिनिधी)-  इतर प्रशासकीय कार्यालयांना नवीन इमारती बांधून देणाऱ्या बांधकाम विभाग मात्र निजाम कालीन इमारतीमध्ये होता. मात्र आता पुढील पन्नास वर्षाची गरज ओळखून धाराशिव शहरात नवीन बांधकाम भवन उभारणीला वेग आला आहे. पाच मजली बांधकाम भवनमध्ये बांधकाम विभागाचे सर्व कार्यालये असणार आहेत. त्यामुळे दोन जिल्ह्यासाठी असलेल्या धाराशिव व बीड जिल्ह्यातील प्रशासकीय इमारती उभारणीला चालना मिळेल असे मानले जात आहे.

बांधकाम भवनच्या पाच मजली इमारतीचे बांधकाम एकूण 7 हजार स्वेअर मीटर असणार आहे. या बांधकाम भवनच्या इमारतीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यालय, कार्यकारी अभियंता कार्यालय, कार्यकारी अभियंता विद्यूत विभाग, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, इमारती उपविभाग, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, विद्युत उपविभाग, यांत्रिकी उपविभाग, क्वॉलिटी कंट्रोल उपविभाग एकाच इमारतीत राहणार आहेत. सर्व कार्यालये एकाच इमारतीत असल्यामुळे प्रशासकीय कामकाजाला चालना मिळेल. पाच मजली असलेल्या या इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात तळमजला अधिक पहिला मजला यासाठी 8 कोटी 48 लाख रूपये मान्यता मिळाली आहे. त्यानंतर सुधारीत प्रस्ताव सादर केल्यावर या आठवड्यात 14 कोटी 15 लाख रूपयांच्या सुधारीत प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा, तिसऱ्या टप्प्यास मंजुरी मिळणार आहे. 


प्रशासकीय कामास चालना मिळेल

धाराशिव शहरात उभारण्यात येणाऱ्या पाच मजली बांधकाम भवनास एकूण 60 कोटी रूपये लागणार असून, टप्प्या-टप्प्याने हे काम पूर्ण होणार आहे. तळ मजला व पहिला मजला याचे पूर्ण काम डिसेंबर 2026 पर्यंत होईल. त्यानंतर दुसरा व तिसऱ्या टप्प्याच्या बांधकाम कामास प्रारंभ होईल. बांधकाम विभागाचे सर्व कार्यालय एकाच इमारतीत असल्यामुळे बीड व धाराशिव जिल्ह्यातील नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामास चालना मिळेल. 

एन. व्ही. भंडे

अधिक्षक अभियंता, बांधकाम विभाग धाराशिव

 
Top